सुब्हानी धर्मार्थ दवाखान्यात मोफत शिबिर

By Admin | Updated: May 25, 2014 16:39 IST2014-05-25T16:25:55+5:302014-05-25T16:39:09+5:30

जुने नाशिक : येथील पिंजारघाट हुसेनी चौकमधील पीर महेबूब-ए-सुब्हानी धर्मार्थ दवाखान्यात मोफत कान, नाक, घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या १४ वर्षांपासून गोरगरीब गरजू रुग्णांना माफक दरात दवाखान्याच्या वतीने आरोग्य सेवा उपलब्ध करू न दिली जात आहे. आज सकाळी दहा वाजता शिबिराला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, एकूण ८५ रुग्णांची तपासणी डॉ. नितीन देवरे, डॉ. जुनेद कुरेशी, डॉ. तारिक कुरेशी, डॉ. असलम पठाण यांनी केल्याची माहिती दवाखान्याचे संचालक हाजी अलिमोद्दीन पिरजादा यांनी दिली.

Free Shibir in Subhani Charitable Hospital | सुब्हानी धर्मार्थ दवाखान्यात मोफत शिबिर

सुब्हानी धर्मार्थ दवाखान्यात मोफत शिबिर

जुने नाशिक : येथील पिंजारघाट हुसेनी चौकमधील पीर महेबूब-ए-सुब्हानी धर्मार्थ दवाखान्यात मोफत कान, नाक, घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या १४ वर्षांपासून गोरगरीब गरजू रुग्णांना माफक दरात दवाखान्याच्या वतीने आरोग्य सेवा उपलब्ध करू न दिली जात आहे. आज सकाळी दहा वाजता शिबिराला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, एकूण ८५ रुग्णांची तपासणी डॉ. नितीन देवरे, डॉ. जुनेद कुरेशी, डॉ. तारिक कुरेशी, डॉ. असलम पठाण यांनी केल्याची माहिती दवाखान्याचे संचालक हाजी अलिमोद्दीन पिरजादा यांनी दिली.

Web Title: Free Shibir in Subhani Charitable Hospital