रुग्ण, नातेवाईकांना पोहोचविले जाते मोफत जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:33+5:302021-05-05T04:24:33+5:30

सद्यस्थितीत शहरात आणि उपनगरांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सातपूरसारख्या कामगार वसाहतीत घरे लहान असल्याने रुग्णांची आणि ...

Free meals are delivered to the patient, relatives | रुग्ण, नातेवाईकांना पोहोचविले जाते मोफत जेवण

रुग्ण, नातेवाईकांना पोहोचविले जाते मोफत जेवण

सद्यस्थितीत शहरात आणि उपनगरांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सातपूरसारख्या कामगार वसाहतीत घरे लहान असल्याने रुग्णांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था खूपच बिकट होत आहे. रुग्ण जरी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाला तरी त्याच्या कुटुंबीयांना विलगीकरणाची सोय होत नाही. त्यामुळे ते सर्रास मार्केटमध्ये खरेदीसाठी बाहेर पडतात आणि सुपर स्प्रेडर्सचे कार्य करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे सुपर स्प्रेडर्स बाहेर पडू नयेत म्हणून त्यांच्या भोजनाची व्यवस्था होणे अपेक्षित आहे. त्यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. सामाजिक वसा घेतलेल्या सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्था आणि निर्मल गंगा ॲग्रो टुरिझम या संस्थांनी मोफत टिफिनची सोय केली आहे.

.रुग्णांना आणि क्वारंटाईन केलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना मोफत घरपोहोच टिफिन पुरविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप तांबे आणि निर्मल गंगा ॲग्रो टुरिझमचे संचालक आशितोष गायकवाड यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या आठ दिवसांत जेहान्स सर्कल, गंगापूररोड, शिवाजीनगर ,श्रमिकनगर, जाधव संकुल, अशोकनगर, सातपूर कॉलनी, पाटील पार्क, आशीर्वाद नगर, भोर टाऊनशिप, संजीव नगर, केवलपार्क, लक्ष्मण टॉऊनशिप, चुंचाळे आदी परिसरातील नागरिकांना मोफत टिफिन सेवा पुरविली आहे. सुरुवातीला पाच टिफिन दिले जात होते. हळूहळू त्यात वाढ होऊन सद्यस्थितीत १०० च्यावर टिफिन घरपोच केले जात आहेत. काही रुग्णालयातील रुग्णांनाही टिफिन सेवा दिली जाते.

इन्फो==

सातपूर परिसरातील कामगार वर्गांची घरे खूपच लहान आहेत. अशा घरात कोणी कोरोना बाधित झाल्यास अथवा क्वारंटाईन झाल्यास त्यांची जेवणाची व्यवस्था होत नाही. असे रुग्ण बाहेर पडल्यास ते सुपरस्प्रेडर्स ठरू शकतात. म्हणून त्यांच्यासाठी मोफत टिफिनची व्यवस्था केली आहे. जे संपर्क साधून टिफिनची मागणी करतात त्यांना मोफत टिफिन दिले जात आहे.

-संदीप तांबे, अध्यक्ष सह्याद्री शिवस्वराज्य सामाजिक संस्था.

Web Title: Free meals are delivered to the patient, relatives