रायगडमध्ये निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोफत केरोसिन : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 08:45 PM2020-06-07T20:45:01+5:302020-06-07T20:55:52+5:30

रायगड जिल्ह्यात वादळग्रस्त कुटुंबांना मोफत केरोसिनचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच राज्यातील अन्य नुकसानग्रस्त जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मागणीनुसार केरोसिन पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Free kerosene for nature cyclone victims in Raigad: Chhagan Bhujbal | रायगडमध्ये निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोफत केरोसिन : छगन भुजबळ

रायगडमध्ये निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोफत केरोसिन : छगन भुजबळ

Next
ठळक मुद्देरायगडमध्ये वादळग्रस्तांना मोफत केरोसिन वाटप होणार अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

नाशिक :रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला असून येथील वादळग्रस्त कुटुंबांना मोफत केरोसिनचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  तसेच राज्यातील अन्य नुकसानग्रस्त जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मागणीनुसार केरोसिन पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
छगन भुजबळ म्हणाले, केंद्र शासनाने  नैसर्गिक आपत्ती, मत्स्य व्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा व मेळावे इत्यादी प्रयोजनांकरिता विनाअनुदानित दराचे केरोसिन राज्यास उपलब्ध करून दिले आहे. त्यानुंषगाने  रायगड  जिल्हयात ३ जूनला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटूबांना मोफत केरोसिन उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार रायगड जिल्हयातील ७ लाख ६९ हजार ३३५ शिधापत्रिका धारक कुटुंबांना प्रत्येकी ५ लिटर केरोसिन वितरित करण्यासाठी विनाअनुदानित दराचे केरोसिन नियतन मंजूर करण्यात येत आहे. या  केरोसिनची उचल संबधित घाऊक केरोसिन परवानाधारकांमार्फत तेल कंपन्यांच्या संबंधित डेपोतून करून त्याचे वितरण बाधित कुटुंबांना प्रति कुटूंब ५ लिटर प्रमाणे करण्यात यावे. हे वितरण शक्यतो रास्तभाव दुकान/किरकोळ केरोसिन परवानाधारकांमार्फत करण्यात यावे. मात्र विशिष्ट परिस्थितीत वेगळी कार्यपध्दती विहित करण्याची मुभा जिल्हा प्रशासनास राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Free kerosene for nature cyclone victims in Raigad: Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.