औंदाणेत दिव्यांगांना मोफत खाद्य तेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:58 IST2020-05-08T16:47:13+5:302020-05-08T16:58:45+5:30

औंदाणे : बागलाण तालूक्यातील औदाणे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सटाणा बाजार समितीच्यावतीने गरजू दिव्यांगांना खाद्य तेलाच्या पाऊचचे मोफत वाटप करण्यात आले.

 Free edible oil for the disabled in Ondane | औंदाणेत दिव्यांगांना मोफत खाद्य तेल

औंदाणेत दिव्यांगांना मोफत खाद्य तेल

औंदाणे : बागलाण तालूक्यातील औदाणे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सटाणा बाजार समितीच्यावतीने गरजू दिव्यांगांना खाद्य तेलाच्या पाऊचचे मोफत वाटप करण्यात आले. लॉकडाऊन सुरू असल्याने ग्रामीण भागात गरीब, रोजंदारी शेतमजूर, अंध, दिव्यांग व्यक्तीं व महिलांचे हाल होत आहेत. अशा व्यक्तीना सटाणा बाजार समितीचे उपसभापती प्रभाकर रौदंळ यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्येकी एक किलो खादय तेलाचे पाऊचचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती चिला निकम, सरपंच सविता निकम, तुषार खैरनार, भिका निकम, नानाजी चव्हाण, उत्तम रौंदळ, भिका रौंदळ, गणेश निकम आदि उपस्थित होते.

Web Title:  Free edible oil for the disabled in Ondane

टॅग्स :Nashikनाशिक