शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

इगतपुरी शहरात बिबट्याचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 5:29 PM

भीतीचे वातावरण : वनविभागाने लावला पिंजरा

ठळक मुद्दे याठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांचा सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास मोठा वावर असतो

इगतपुरी : शहरातील रेल्वे वसाहत, गावठा, शिवाजी नगर, मिलिंद नगर, पाइपलाइन परिसरात बिबट्याचा सध्या मुक्त संचार सुरु असून परिसरातील नागरिकांना चार-पाच दिवसांपासून बिबट्याचे रोजच दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे.इगतपुरी शहरात रात्री-बेरात्री बिबट्या नागरीकांना परिसरातील वेगवेगळ्या भागात दर्शन देतो आहे. या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पशुधन सांभाळण्यासाठी शेतकरी रात्र जागून काढत आहेत. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. शेती कामानिमित्त शेतातच राहणारे शेतकरी जीव मुठीत धरून वास्तव्य करीत आहेत. या परिसरात रेल्वेचे अनेक महत्वाची कार्यालये असून, रेल्वे वसाहत देखील आहे. त्यामुळे याठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांचा सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास मोठा वावर असतो. परिसरातून विद्यार्थी, रेल्वे कामगार, महिला वर्ग कामासाठी या रस्त्याने दुचाकी वरु न तसेच पायी ये जा करत असतात. आता बिबटयाच्या संचारामुळे सायंकाळी सात नंतर अघोषित संचारबंदी लागू झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.पशुधन धोक्यातआम्ही शेती कामानिमित्त मळ्यातच राहतो. शेतीला पाणी भरणे, विद्युत मोटारी सुरु करणेसाठी रात्री-बेरात्री ये-जा करावी लागते. पर्याय नसल्याने जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. दररोज परिसरात कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होते आहे. त्यामुळे पशुधनही धोक्यात आले आहे. वनविभागाने एखादी अप्रिय घटना घडण्याअगोदर यावर कार्यवाही करावी.- भूषण जाधव, नागरिक , गावठा

टॅग्स :Nashikनाशिक