सिडको-सातपूरसाठी मोफत रुग्णवाहिका सेवां

By Admin | Updated: August 6, 2014 01:56 IST2014-08-06T01:55:03+5:302014-08-06T01:56:20+5:30

सिडको-सातपूरसाठी मोफत रुग्णवाहिका सेवां

Free ambulance services for CIDCO-Satpur | सिडको-सातपूरसाठी मोफत रुग्णवाहिका सेवां

सिडको-सातपूरसाठी मोफत रुग्णवाहिका सेवां

 

सिडको : आमदार नितीन भोसले यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असून, सदर सेवा केवळ नाशिक शहरापुरतीच मर्यादित राहणार आहे. सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून भोसले यांनी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन भोसले यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. याशिवाय मतदारसंघात विविध विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा ठसाही उमटविला आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्र मोठे आहे. सिडको-सातपूर परिसरात वाढती लोकवस्ती आणि कामगार व मध्यमवर्गीयांचे वास्तव्य पाहता नितीन भोसले यांनी मोफत रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सदर रुग्णवाहिका मतदारसंघातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, रुग्णवाहिकेसाठी नागरिकांना आमदार नितीन भोसले यांचे जनसंपर्क कार्यालय, पूरब- पश्चिम प्लाझा, शॉप नंबर १ व २, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक (दूरध्वनी- ०२५३-२३७३००७ अथवा ९८२३८५६७५१) या ठिकाणी संपर्क साधता येईल. (* वार्ताहर)

Web Title: Free ambulance services for CIDCO-Satpur