शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

‘त्या’ गुन्ह्यातील फरार संशयित आढावकडून भागीदारांचीही फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:49 IST

आर्थिक गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांचे फसवणुकीचे विविध कारनामे बाहेर येत आहेत़

नाशिक : आर्थिक गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांचे फसवणुकीचे विविध कारनामे बाहेर येत आहेत़ संचालक श्रेयस राजेंद्र आढाव (रा़ निर्मल निकेतन, गंगापूर नाका) याने केवळ गुंतवूणकदारांची नव्हे, तर हॉटेल व्यवसायातील आपल्या भागीदाराची दीड कोटी रुपयांची, तर हॉटेल भाडेतत्त्वावर दिलेल्या महिलेकडून २० लाख रुपये घेऊन त्यांची फसवणकू केल्याचे समोर आले आहे़ गंगापूर रोडवरील हितेंद्र वानखेडे व जयश्री थोरात आणि भालचंद्र आघारकर यांची ही फसवणूक झाली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे़  गंगापूर रोड परिसरातील रहिवासी हितेंद्र वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची संशयित आढाव सोबत हॉटेल व्यवसायात भागीदारी होती़ २०१६ मध्ये त्र्यंबकरोडवरील बेलगाव ढगा येथील जागेवर हॉटेल स्वराजचे बांधकाम कर, चालव व मला महिन्याकाठी ठराविक रक्कम दे असे आढाव याने सांगितले़ त्यानुसार वानखेडे यांनी हॉटेलचे बांधकाम केले व भागीदारीचा करारनामाही केला़ मात्र हॉटेलचे काम पूर्ण झाल्यावर भांडण करून तुझे बांधकामाचे दीड कोटी रुपये परत करतो असे सांगितले मात्र एक रुपयाही परत न करता फसवणूक केली़संचालक आढाव याने या दोघांबरोबरच मालेगाव येथील भालचंद्र आघारकर यांच्याकडून २०१६ मध्ये साडेबारा लाख रुपये घेतले़ यानंतर पैसे परत करण्यासाठी चेकही दिला, मात्र बँकेस सांगून चेक स्टॉप केला़ संशयित आढाव याने केवळ या तिघांचीच नव्हे तर आणखीणही अनेकांची फसवणूक केल्याची चर्चा आहे़ दरम्यान, या फसवणुकीबाबत लवकरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले़हॉटेल चालविण्यास देण्यासाठी घेतले डिपॉझिटच्आढाव याने जयश्री पंजाबराव थोरात यांना ५० लाख रुपये डिपॉझिट सांगून हॉटेल स्वराज चालविण्यासाठी दिले़ त्यानुसार त्यांनी मार्च २०१७ मध्ये २० लाख रुपये दिले, तर उर्वरित ३० लाख रुपये बेक्वेट हॉल व इतर अर्धवट कामे पूर्ण केल्यानंतर देऊ असे सांगितले, त्यानुसार भाडेकरारही केला़ मात्र ही कामे न करताच उर्वरित ३० लाखांची मागणी आढाव करीत होते़ यास नकार दिल्याने त्यांनाही हॉटेल खाली करण्यास सांगितले़ यानंतर दोन-तीन दिवसांत चेकद्वारे पैसे परत करतो असे सांगून कॅन्सलेशन डीड केली मात्र चेक दिलाच नाही़ त्यांचे सुमारे सात ते आठ लाखांचे सामान आजही या ठिकाणी पडून आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा