मालेगाव तालुक्यात बनावट दस्तऐवजाद्वारे फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:23+5:302021-03-13T04:26:23+5:30
तालुक्यात सायने खुर्द शिवारात बनावट आधारकार्ड व कागदपत्र सादर करून जमीन आपल्या नावावर करून घेणाऱ्या फसवणूक केल्याप्रकरणी उज्वल भामरे ...

मालेगाव तालुक्यात बनावट दस्तऐवजाद्वारे फसवणूक
तालुक्यात सायने खुर्द शिवारात बनावट आधारकार्ड व कागदपत्र सादर करून जमीन आपल्या नावावर करून घेणाऱ्या फसवणूक केल्याप्रकरणी उज्वल भामरे व केशव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वऱ्हाणे पाडा येथील जमिनीसंदर्भात बनावट कागदपत्र तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयात फिर्यादीच्या जागी दुसऱ्याच माणसाला उभे करून फसवणूक केली म्हणून प्रसाद पाटोळे, प्रदीप महाजन, भरती तारू, नरेंद्र भावसार,अन्वर राजन यांचे विरोधात छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. संगमेश्वरातील जमीन परस्पर हडप करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या सरला चौधरी, कांचन महाले, अर्जुन भाटी, शफीकुरहेमान, भाऊसाहेब सूर्यवंशी गणेश शिंदे यांचे विरोधात छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुखांनी पत्रकान्वये दिली आहे.