शेतजमीन विक्रीत फसवणूक, भारदेनगरला दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:39+5:302021-06-26T04:11:39+5:30
सेवानिवृत्त बेलीफ गोविंद एकनाथ शिर्के रा. संगमेश्वर कलेेक्टरपट्टा यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. शेती विकायची असून बनावट व्यक्तीस शेतमालक ...

शेतजमीन विक्रीत फसवणूक, भारदेनगरला दोघे अटकेत
सेवानिवृत्त बेलीफ गोविंद एकनाथ शिर्के रा. संगमेश्वर कलेेक्टरपट्टा यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. शेती विकायची असून बनावट व्यक्तीस शेतमालक आहे असे भासवून भारदेनगर येथील शेतमालक खंडू उखडू गवळी यांच्या मालकीची गट क्र. ६३/२ मधील दोन हेक्टर ३३ आर अशी शेतजमीन विक्री करायचे आहे, असे सांगितले. त्यासाठी फिर्यादीच्या राहत्या घरी बनावट नावाच्या व्यक्ती नेल्या. तेच शेतमालक आहेत असे भासवून फिर्यादीकडून वेळोवेळी ७ लाख ५० हजार रुपये घेऊन ऑनलाईन बनावट चलने फिर्यादीस दाखवली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी तक्रार करण्यासाठी जात असताना ७ लाख ५० हजारांचा धनादेश नोटरी दस्त तयार करून दिला. परंतु फिर्यादीने धनादेश बँकेत टाकला असता खात्यात पैसे नसल्याचे बँकेने त्यांना कळविले. त्यामुळे चौघा आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक बस्ते करीत आहेत.