कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:34 IST2020-08-06T22:50:00+5:302020-08-07T00:34:25+5:30
नाशिक : बॅँकेतून कर्ज मिळवून देतो, असे आश्वासन देत एकाची तब्बल वीस लाख रु पयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निवृत्ती वामनराव भदाणे (४४, रा. व्हिस्टा हौसिंग सोसायटी) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक
ठळक मुद्देइंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नाशिक : बॅँकेतून कर्ज मिळवून देतो, असे आश्वासन देत एकाची तब्बल वीस लाख रु पयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निवृत्ती वामनराव भदाणे (४४, रा. व्हिस्टा हौसिंग सोसायटी) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संशयित तेजिंदर कौर नुरी, दगडू विठ्ठल ताठे (दोघे, रा. पुणे) यांनी सहकारी बॅँकेतून कर्ज मिळवून देण्याचे अमीष दाखवत नोव्हेंबर २०१७ ते ४ आॅगस्ट २०२० दरम्यान फिर्यादीकडून २० लाख रु पये घेतले. मात्र तरीही कर्ज मिळवून दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.