मालेगावी वारस नोंदीत फसवणूक; पोलिसात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST2021-07-02T04:11:12+5:302021-07-02T04:11:12+5:30

एच.ई. कॅ. अमित के. अग्रवाल, (३२) रा. मुंबई यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार मालेगाव येथील जुना ...

Fraud in Malegaon heir registration; Filed a crime with the police | मालेगावी वारस नोंदीत फसवणूक; पोलिसात गुन्हा दाखल

मालेगावी वारस नोंदीत फसवणूक; पोलिसात गुन्हा दाखल

एच.ई. कॅ. अमित के. अग्रवाल, (३२) रा. मुंबई यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार मालेगाव येथील जुना आग्रा रोडवरील निसर्ग हॉटेलजवळील मिळकत सुप्रीम ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन प्रा. लि. कंपनीच्या मालकीचे आहे. त्याच्या व्यवस्थापनाचे अधिकार कंपनीने सतीश अग्रवाल यांना दिले होते. ते ३० नोव्हेंबर २०१७ रोजी मृत झाले. त्यांचा मुलगा दीपक, सुमनदेवी, तनुश्री यांनी संगनमत करून ही मिळकत सतीश अग्रवाल यांच्या मालकीची वारसा हक्काची असल्याचे भासवून वारस नोंद होण्यासाठी अर्ज देऊन खोटे प्रतिज्ञापत्र तयार करत ही मिळकत नावे करून केली. तलाठी व मंडल अधिकारी यांनी पंचनामा करून खोट्या दस्तऐवजाच्या आधारे परस्पर वारस नोंद करून दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Fraud in Malegaon heir registration; Filed a crime with the police