शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

द्राक्ष उत्पादकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 19:29 IST

वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, अवनखेड, पाडे, वरखेडा येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापा-याने १०,४०,७०५ रुपयांची द्राक्षे खरेदी करून पलायन केल्याने दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

ठळक मुद्देदिंडोरी : द्राक्षे खरेदी करून पैसे न देता केला पोबारा

वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, अवनखेड, पाडे, वरखेडा येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापा-याने १०,४०,७०५ रुपयांची द्राक्षे खरेदी करून पलायन केल्याने दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.तालुक्यातील लखमापूर, अवनखेड, वरखेडा येथील द्राक्षे उत्पादकांनी आपली द्राक्षे महबूब खान, बच्चन बेग (रा. ककराळा, ता. बदायू, उत्तर प्रदेश) यांना दिली. द्राक्षे काढणीनंतर पाठविलेल्या आपल्या द्राक्ष मालाचे पैसे आणण्यासाठी शेतकरीवर्ग सदर दोन्ही व्यापारी राहत असलेल्या पेढीवर गेले असता, हे व्यापारी दोन ते तीन दिवसांपासून गायब असल्याची माहिती पुढे आली. त्यांच्याशी संपर्क केला असता मोबाइल बंद असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहे.दुसरी घटना याच पद्धतीने पाडे येथेही घडली आहे. त्यामध्ये सुकदेव नामक द्राक्ष व्यापाऱ्याने लाखो रुपयांना गंडा घालून पलायन गेले. सदर व्यापाऱ्यांनी मंगेश विष्णू जाधव (अवनखेड) एक लाख ५० हजार रुपये, गणेश बाळासाहेब कामाले (अवनखेड) एक लाख २० हजार, अमोल संपत मोगल (लखमापूर) एक लाख ५० हजार, किरण बाळासाहेब चव्हाण (लखमापूर) एक लाख ७० हजार, किशोर छगन कुशारे (वरखेडा) एक लाख ८० हजार, दीपक रामनाथ पेलमहाले (पाडे) एक लाख २९ हजार ७०५, नामदेव तानाजी पगार (उमराळे) एक लाख ५० हजार रुपये किमतीची द्राक्षे विकत घेतली. मात्र, मालाची रक्कम न देता सदर द्राक्ष व्यापाऱ्यांनी पलायन केले. परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीचे दुष्टचक्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. द्राक्षे खरेदी-विक्री व्यवहार प्रणालीला अगोदरच कोरोनाची साडेसाती लागली आहे. त्यात खरेदीदार व्यापारी यांची संख्या मर्यादित आहे. विशेषतः परप्रांतीय व्यापारी यांची संख्या लक्षणीय आहे. द्राक्षे हंगामाच्या अंतिम सत्रात नियोजनबद्ध फसवणूक करण्यात तरबेज असलेले परप्रांतीय व्यापारी यांच्या आर्थिक क्षमतेची वास्तविक माहिती उत्पादकांना नसते. साखरपेरणीच्या भाषेला भुलून उत्पादक त्यांच्याशी व्यवहार करतात व त्यांना फसवणुकीला सामोरे जावे लागते.दरम्यान, द्राक्ष या पिकाला बेमोसमी पाऊस व कोरोना या संकटांना सामोरे जावे लागले त्यामुळे उत्पादक या संकटाचा सामना करताना कसेबसे सावरत असताना परप्रांतीय व्यापारी यांनी फसवणूक केल्याने उत्पादक चिंतित झाले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीCrime Newsगुन्हेगारी