द्राक्ष उत्पादकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 07:28 PM2021-03-21T19:28:37+5:302021-03-21T19:29:01+5:30

वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, अवनखेड, पाडे, वरखेडा येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापा-याने १०,४०,७०५ रुपयांची द्राक्षे खरेदी करून पलायन केल्याने दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

Fraud of grape growers | द्राक्ष उत्पादकांची फसवणूक

द्राक्ष उत्पादकांची फसवणूक

Next
ठळक मुद्देदिंडोरी : द्राक्षे खरेदी करून पैसे न देता केला पोबारा

वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, अवनखेड, पाडे, वरखेडा येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापा-याने १०,४०,७०५ रुपयांची द्राक्षे खरेदी करून पलायन केल्याने दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
तालुक्यातील लखमापूर, अवनखेड, वरखेडा येथील द्राक्षे उत्पादकांनी आपली द्राक्षे महबूब खान, बच्चन बेग (रा. ककराळा, ता. बदायू, उत्तर प्रदेश) यांना दिली. द्राक्षे काढणीनंतर पाठविलेल्या आपल्या द्राक्ष मालाचे पैसे आणण्यासाठी शेतकरीवर्ग सदर दोन्ही व्यापारी राहत असलेल्या पेढीवर गेले असता, हे व्यापारी दोन ते तीन दिवसांपासून गायब असल्याची माहिती पुढे आली. त्यांच्याशी संपर्क केला असता मोबाइल बंद असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहे.
दुसरी घटना याच पद्धतीने पाडे येथेही घडली आहे. त्यामध्ये सुकदेव नामक द्राक्ष व्यापाऱ्याने लाखो रुपयांना गंडा घालून पलायन गेले. सदर व्यापाऱ्यांनी मंगेश विष्णू जाधव (अवनखेड) एक लाख ५० हजार रुपये, गणेश बाळासाहेब कामाले (अवनखेड) एक लाख २० हजार, अमोल संपत मोगल (लखमापूर) एक लाख ५० हजार, किरण बाळासाहेब चव्हाण (लखमापूर) एक लाख ७० हजार, किशोर छगन कुशारे (वरखेडा) एक लाख ८० हजार, दीपक रामनाथ पेलमहाले (पाडे) एक लाख २९ हजार ७०५, नामदेव तानाजी पगार (उमराळे) एक लाख ५० हजार रुपये किमतीची द्राक्षे विकत घेतली. मात्र, मालाची रक्कम न देता सदर द्राक्ष व्यापाऱ्यांनी पलायन केले. परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीचे दुष्टचक्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. द्राक्षे खरेदी-विक्री व्यवहार प्रणालीला अगोदरच कोरोनाची साडेसाती लागली आहे. त्यात खरेदीदार व्यापारी यांची संख्या मर्यादित आहे. विशेषतः परप्रांतीय व्यापारी यांची संख्या लक्षणीय आहे. द्राक्षे हंगामाच्या अंतिम सत्रात नियोजनबद्ध फसवणूक करण्यात तरबेज असलेले परप्रांतीय व्यापारी यांच्या आर्थिक क्षमतेची वास्तविक माहिती उत्पादकांना नसते. साखरपेरणीच्या भाषेला भुलून उत्पादक त्यांच्याशी व्यवहार करतात व त्यांना फसवणुकीला सामोरे जावे लागते.

दरम्यान, द्राक्ष या पिकाला बेमोसमी पाऊस व कोरोना या संकटांना सामोरे जावे लागले त्यामुळे उत्पादक या संकटाचा सामना करताना कसेबसे सावरत असताना परप्रांतीय व्यापारी यांनी फसवणूक केल्याने उत्पादक चिंतित झाले आहेत.

Web Title: Fraud of grape growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.