ऊर्जामंत्र्यांसह कार्यकारी संचालकांकडून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:51+5:302021-02-05T05:40:51+5:30
उपनगर आणि नाशिकरोडसह सर्व पोलीस ठाण्यांना मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात महावितरणने वीज मिटर रिडिंगसाठी प्रतिनिधी ...

ऊर्जामंत्र्यांसह कार्यकारी संचालकांकडून फसवणूक
उपनगर आणि नाशिकरोडसह सर्व पोलीस ठाण्यांना मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात महावितरणने वीज मिटर रिडिंगसाठी प्रतिनिधी पाठविले नाहीत, बिले दिली नाहीत. मात्र, चौपट रकमेची बिले पाठवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे तक्रारी केल्या. ऊर्जामंत्री, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि वीज कंपन्यांचे प्रमुख अधिकारी यांच्यात बैठकाही झाल्या. वीजबिलात कपातीचा निर्णय लवकरच घेऊन नागरिकांना दिलासा देऊ, असे आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिले. मात्र, त्यांनी घूमजाव केले. गेल्या सहा महिन्यांतील विश्वासघाताचा घटनाक्रम लक्षात घेतला तर राज्यातील जनतेची फसवणूक केल्याचे स्पष्ट होते. ग्राहकांना अवास्तव वाढीव वीजबिले पाठवणे, खोटे आश्वासन देणे, वीज कंपन्यांशी संगनमत करुन जनतेची लूट करणे, आर्थिक लुबाडणुकीचा कट रचणे आदी प्रकरणी दोषींविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर विक्रम कदम, बंटी कोरडे, संतोष सहाणे, प्रमोद साखरे, नितिन पंडीत, शशी चौधरी, नितीन धानापुणे, साहेबराव खर्जुल, निखिल सरपोतदार, सत्यम खंडबहाले, कौशल पाटील, सौरभ सोनवणे, अक्षय कोंबडे, संदीप भवर, विनायक पगारे, सचिन भोसले आदींच्या सह्या आहेत.
(फोटो २८ मनसे) कॅप्शन- पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांना निवेदन देतांना विक्रम कदम, बंटी कोरडे, संतोष सहाणे, प्रमोद साखरे, नितिन पंडीत, शशी चौधरी, नितीन धानापुणे, साहेबराव खर्जुल आदी.