Fourth house arrest in Chadegaon Shivar | चाडेगाव शिवारात चौथा बिबट्या जेरबंद

चाडेगाव शिवारात चौथा बिबट्या जेरबंद

एकलहरे : चाडेगाव शिवारात सोमवारी (दि.१६) पहाटे ४ वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. परिसरात पिंजºयात अडकलेला हा चौथा बिबट्या असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या दि.२० जुलै रोजी रात्रीच्या सुमारास चार वर्षे वयाची बिबट्या मादी पिंजºयात जेरबंद झाली होती, तत्पूर्वी १० जुलैच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला होता. त्याचवेळी या परिसरात अजूनही बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले होते. आता सोमवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्या जेरबंद झाला. चाडेगाव शिवारात दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने तीन नर व एक मादी असे चार बिबटे जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सोमवारी पहाटे रहिवासी पगारे यांच्या पाळीव श्वान व
बकरीवर बिबट्याने हल्ला केल्याने त्या आवाजाने वाघ कुटुंबीय बाहेर आले असता शेतात लावलेल्या पिंंजºयात जेरबंद झाला होता.
तीनही वेळी एकच
बोकड पिंजºयात
पहिल्यांदा निशांत वाघ यांच्या शेतात बिबट्या पिंजºयात अडकला. नंतर मंगेश वाघ यांच्या शेतात बिबट्याची मादी जेरबंद झाली. आता पुन्हा निशांत वाघ यांच्या शेतात नर बिबट्या जेरबंद झाला. या तीनही वेळी एकच बोकड पिंजºयात ठेवण्यात आला होता हे विशेष.

Web Title: Fourth house arrest in Chadegaon Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.