चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
By Admin | Updated: July 22, 2015 01:19 IST2015-07-22T01:19:00+5:302015-07-22T01:19:12+5:30
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
नाशिक : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माले यांच्या कार्यपद्धतीविरोधात सुरू असलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरूच होते.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यपद्धतीविषयी दिलेल्या निवेदनाची तड लागावी या मागणीसाठी या संघटनेचे सोमवारपासून आंदोलन सुरू आहे. रणरागिणी महिला मंचातर्फे यासाठी निदर्शनेही करण्यात आली. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष उज्ज्वला कराड, मीना मारू यांनी यासाठी उपोषणही सुरू केले आहे. काम न करता केवळ स्वाक्षरी करून पगार घेणाऱ्यांची नावे द्यावीत, कंत्राटी कर्मचाऱ्यांची माहिती मिळावी, आठ वर्षांपासून एकाच संस्थेला देण्यात येत असलेले कंत्राट, कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन, कामाचे स्वरूप याची माहिती मिळावी तसेच महिला कर्मचाऱ्यांशी उद्दामपणे वागणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सकांची चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर उज्ज्वला कराड, छाया निकम, मीना मारू, राजेंद्र अहिरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)