मालेगाव महापौरपदासाठी चौघांचे अर्ज

By Admin | Updated: June 10, 2017 00:48 IST2017-06-10T00:47:40+5:302017-06-10T00:48:00+5:30

ंमालेगाव :महापौरपदासाठी कॉँग्रेसतर्फे ताहेरा शेख रशीद तर जनता दलातर्फे बुलंद एकबाल निहाल अहमद यांनी नगरसचिव राजेश धसे यांच्याकडे अर्ज दाखल केला

Fourth application for Malegaon Mayor | मालेगाव महापौरपदासाठी चौघांचे अर्ज

मालेगाव महापौरपदासाठी चौघांचे अर्ज


लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी शुक्रवारी कॉँग्रेसतर्फे ताहेरा शेख रशीद तर जनता दलातर्फे बुलंद एकबाल निहाल अहमद यांनी नगरसचिव राजेश धसे यांच्याकडे अर्ज दाखल केला. उपमहापौरपदासाठी भाजपाचे सुनील गायकवाड, राकॉँचे अन्सारी मन्सुर अहमद शब्बीर अहमद यांनी अर्ज दाखल केले.
ताहेरा शेख यांनी महापौर पदासाठी दोन अर्ज दाखल केले. त्यांच्या उमेदवारी अर्जावर शबाना सलीम शेख यांची सूचक म्हणून तर नईम इब्राहीम पटेल यांचे अनुमोदक म्हणून सही आहे. दुसऱ्या अर्जावर इस्त्राईल खा इस्माईल हे सूचक असून, नजीर अहमद इर्शाद हे अनुमोदक आहेत.
महापौरपदासाठी बुलंद एकबाल यांच्या अर्जावर त्यांची बहीण शान-ए-हिंद निहाल अहमद या सूचक असून, अ. बाकी मो. इस्माईल हे अनुमोदक आहेत.
महापौरपदासाठी नाबी अहमद अहमदुल्ला यांच्या अर्जावर मोहंमद सुबान मो. आय्युब हे सूचक असून, एजाज बेग हे अनुमोदक आहेत. त्यांच्या दुसऱ्या अर्जावर शेख कलीम दिलावर हे सूचक असून, साजेदाबानो मोहंमद अन्सारी या अनुमोदक आहेत.
उपमहापौर पदासाठी भाजपाचे सुनील गायकवाड यांनी
भरलेल्या उमेदवारी अर्जावर त्यांचे बंधू मदन गायकवाड हे सूचक असून, संजय काळे हे अनुमोदक आहेत. सुनील गायकवाड यांच्या दुसऱ्या अर्जावर भरत बागुल हे सूचक असून, सुवर्णा शेलार या अनुमोदक
आहेत.
उपमहापौरपदासाठी राकॉँचे अन्सारी मन्सुर अहमद शब्बीर अहमद यांच्या अर्जावर यास्मीनबानो एजाज बेग या सूचक असून शबानाबानो सय्यद या अनुमोदक आहेत.

Web Title: Fourth application for Malegaon Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.