गुदाम कोसळून चौघे युवक गंभीर

By Admin | Updated: March 22, 2017 23:59 IST2017-03-22T23:59:17+5:302017-03-22T23:59:33+5:30

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथे आदिवासी सेवा सहकारी सोसायटीच्या गुदामाची भिंत कोसळून चार युवक गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

The four youths were seriously injured in the incident | गुदाम कोसळून चौघे युवक गंभीर

गुदाम कोसळून चौघे युवक गंभीर

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथे आदिवासी सेवा सहकारी सोसायटीच्या गुदामाची भिंत कोसळून चार युवक गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कनाशी येथे आदिवासी सेवा सहकारी सोसायटीचे गुदाम आहे. ते आदिवासी विकास महामंडळाने भाडेतत्त्वावर घेतले असून, त्यातून तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांना धान्य पुरवठा केला जात असून, एकाधिकार खरेदीचा मालही ठेवलेला आहे. सदर गुदामाच्या बांधकामाला ४५ वर्षे झालेले आहेत. गुदामामध्ये धान्य वितरणाचा माल ठेवण्यात येतो. मात्र गुदामाचे बांधकाम फार जुने झाल्याने ते कधीही पडू शकते. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविली जात होती ती आज खरी ठरली आहे. (वार्ताहर)

कनाशी येथे गुदामाची पडलेली भिंत.

Web Title: The four youths were seriously injured in the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.