चार वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 13:09 IST2019-11-29T13:09:22+5:302019-11-29T13:09:43+5:30
अंदरसुल : येथील सोनवणे वस्तीवरील विहिरीत परप्रांतीय शेतमजुराच्या चार वर्षीय बालकाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यु झाला. अंदरसुल शिवारातील हरिश्चंद्र धोंडीराम ...

चार वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत बुडून मृत्यू
अंदरसुल : येथील सोनवणे वस्तीवरील विहिरीत परप्रांतीय शेतमजुराच्या चार वर्षीय बालकाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यु झाला. अंदरसुल शिवारातील हरिश्चंद्र धोंडीराम सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत सोमवार (दि.२६) रोजी सायंकाळच्या सुमारास मध्यप्रदेश येथील शेतमजूर कुवार सिंग जाधव राहणार झापडी पाडला ता. सेंधवा जि.बडवाणी यांचा चार वर्षीय बालक अर्जुन हा विहिरीत पडला. दरम्यान विहीर तुडुंब भरली असल्याने दुसऱ्या दिवशी मृतदेह शोधण्यासाठी कोपरगाव येथील खाजगी गोताखोर बोलून शोधमोहीम सुरू केली असता मृतदेह आढळून आला नाही. सायंकाळ झाल्याने शोधकार्य थांबवून तिसºया दिवशीचांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समिती शोध व बचाव पथकाचे सागर गडाख वैभव जमघडे, सुरेश शेटे, विलास गांगुर्डे व ग्रामस्थ यांच्या तब्बल दोन तासांच्या शोध प्रक्रि येनंतर मृतदेह आढळून आला. याबाबत येवला तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.