उपजिल्हा रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या चार संशयिताना अटक
By Admin | Updated: May 6, 2017 23:29 IST2017-05-06T23:28:48+5:302017-05-06T23:29:01+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील उपजिल्हा रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी चार जणांना अटक करून पोलीस कस्टडी देण्यात आली होती.

उपजिल्हा रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या चार संशयिताना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : येथील उपजिल्हा रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक करण्यास सुरुवात केली असून, सुमारे ३० ते ३५ संशयितांपैकी चार जणांना अटक करून एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली होती.
गेल्या ११ एप्रिल रोजी खंबाळे (त्र्यंबक) फाटा येथे एका कार अपघातात खंबाळे येथील आठ वर्ष वयाच्या बालकाचा कारने धडक दिल्याने मृत्यू झाला. कारचालक मयत बालकास त्याच्या आईसह त्र्यंबकेश्वर येथे दवाखान्यात सोडून पळून गेला होता.
याबाबत पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी, पोलीस हवालदार मेघराज जाधव आदि तपास करत आहेत.