शहरात एकाच दिवसात चौघांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 01:52 AM2021-07-30T01:52:02+5:302021-07-30T01:52:26+5:30

शहर परिसरात वेगवेगळ्या घटनात चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नसले तरी, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरूवात केली आहे.

Four suicides in a single day in the city | शहरात एकाच दिवसात चौघांच्या आत्महत्या

शहरात एकाच दिवसात चौघांच्या आत्महत्या

Next

नाशिक : शहर परिसरात वेगवेगळ्या घटनात चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नसले तरी, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरूवात केली आहे.

जेलरोडला राजराजेश्वरी मंगल कार्यालय परिसरातील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. सचिन गणेश पवार (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या मृताचे नाव आहे. मृत गणेश व्यायाम शाळेजवळील गोविद जाधव यांच्या घरात राहायला असून मंगळवारी (दि. २७) रात्री साडेदहाच्या सुमारास त्याने घरातील माळ्याला टॉवेल बांधून गळफास घेतल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी रवींद्र गुलाब ठाकूर यांच्या तक्रारीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसरा प्रकार पंचवटीतील धात्रक फाटा परिसरातील बलरामनगरला उघडकीस आला. वैष्णवी नितीन कर्पे (वय २३, स्वर्णप्रभा बंगला) यांनी बुधवारी (दि. २८) दुपारी राहत्या घरी हॉलमध्ये लोखंडी जिन्याच्या रॅलिंगला पिवळ्या रंगाच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या घटनेत रत्ना नंदू सुर्वे (वय ३५, राजहंस अपार्टमेंट, धात्रक फाटा) या महिलेने बुधवार (दि. २८) अडीचच्या सुमारास राहत्या घरातील हॉलमध्ये छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. चौथी घटना सिडको परिसरात उघडकीस आली. नीलेश सुरेश वाघ (वय ३५, रायगड चौक सिडको) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी (दि. २८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरी ओढणीने घराच्या छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Four suicides in a single day in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.