वाडीवºहेजवळ अपघातात चार जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 01:00 IST2020-07-18T20:34:32+5:302020-07-19T01:00:04+5:30

वाडीवºहे : नाशिक-मुंबई महामार्गावरील वाडीवºहेजवळ झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाडीवºहे पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Four persons were seriously injured in an accident near Wadiv | वाडीवºहेजवळ अपघातात चार जण गंभीर जखमी

वाडीवºहेजवळ अपघातात चार जण गंभीर जखमी

वाडीवºहे : नाशिक-मुंबई महामार्गावरील वाडीवºहेजवळ झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाडीवºहे पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथून गुंजाळ आणि मन्ने कुटुंबीय मुंबई येथे कारने (एमएच ०४ एफआर ३९९१) जात असताना वाडीवºहेजवळ कार अज्ञात वाहनावर मागून जोरदार आदळली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले असून, इतर आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीना जगद्गुरु नरेंद्र महराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेतून जिल्हा रु ग्णालयात हलविले. या अपघातात खुशी कुमार गुंजाळ (१७), विजय व्यंकट गुंजाळ (३८), सुशीला गायकवाड (६५), दुर्गा विजय गुंजाळ हे गंभीर जखमी झाले, तर मनोरमा कुमार गुंजाळ (४०), रमेश व्यंकय्या गुंजाळ (७०), ईशा प्रमोद मन्ने (१३), रोहित प्रमोद मन्ने (१०), सिद्धी विजय गुंजाळ (१२), रिद्धी विजय गुंजाळ (१०), रेखा रमेश मन्ने (५०), चालक मोहम्मद रफीक अतीक (३४) किरकोळ जखमी झाले. या वाहनात १२ प्रवासी प्रवास करत होते. ज्या वाहनावर कार आदळली ते वाहन अपघतानंतर फरार झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनखाली हवालदार खांदवे करीत आहेत.

Web Title: Four persons were seriously injured in an accident near Wadiv

टॅग्स :Nashikनाशिक