देवगावसह परिसरातील चार जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:05 IST2020-07-31T23:04:06+5:302020-08-01T01:05:50+5:30
देवगाव येथे आढळून आलेले चार बाधित कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. येथे १४ जुलै रोजी पहिला ३२ वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळला होता. त्यास पिंपळगाव बसवंत येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

देवगावसह परिसरातील चार जण कोरोनामुक्त
देवगाव : येथे आढळून आलेले चार बाधित कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. येथे १४ जुलै रोजी पहिला ३२ वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळला होता. त्यास पिंपळगाव बसवंत येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.
प्रशासनाने गंभीर दखल घेत खबरदारी म्हणून रुग्ण राहत असलेला मारुती मंदिर परिसर सील केला होता. त्यानंतर कुंटुबातील दोन महिला व चार वर्षांचा मुलगा या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही पिंपळगाव येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या रुग्णांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिल्याने ते कोरोनामुक्त झाले. त्यांना जिल्हा परिषद शाळेत दहा दिवस क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. हे चारही रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले तेव्हा गावकऱ्यांनी फुलांची उधळण व टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. निफाड तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. अनेकजण कुठलेच नियम पाळत नाही. तोंडाला मास्कसुद्धा लावत नाही. याकडे स्थानिक प्रशासाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
तिघांना दिलासा
येवला : बाभुळगाव येथील अलगीकरण केंद्रातून शहरातील तीन बाधित शुक्र वारी, कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २५४ असून यापैकी २२४ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोनाने १७ बळी गेले असून सद्यस्थितीत बाधित अॅक्टीव्ह रूग्णसंख्या १३ असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांनी सांगितले. बाधित १३ रूग्णांपैकी नाशिक येथील रूग्णालयात सहा, बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात सहा तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये एक रूग्ण औषधोपचार घेत असल्याचेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले.