चांदवड तालुक्यात पुन्हा चार नवे कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 01:44 IST2020-09-02T23:49:33+5:302020-09-03T01:44:12+5:30

चांदवड : तालुक्यात सोमवारी (दि. ३१) रोजी पुन्हा चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Four new corona affected in Chandwad taluka | चांदवड तालुक्यात पुन्हा चार नवे कोरोनाबाधित

चांदवड तालुक्यात पुन्हा चार नवे कोरोनाबाधित

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून तालुक्यात रुग्णवाढीचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : तालुक्यात सोमवारी (दि. ३१) रोजी पुन्हा चार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
पिंपळणारे येथे २२ वर्षीय पुरु ष, चांदवड येथील गजानन कॉलनीतील ५६ वर्षीय पुरुष, वडाळीभोई येथील ६६ वर्षीय पुरुष, वडनेरभैरव येथील ६८ वर्षीय पुरुष असे चार रुण आढळल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात रुग्णवाढीचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये, तोंडाला नेहमी मास्क लावावे, हात सतत धूत राहावे, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Four new corona affected in Chandwad taluka