खून करणाऱ्या चौघांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 01:33 IST2021-07-31T01:32:15+5:302021-07-31T01:33:03+5:30

सिडको येथील स्टेट बँक चौपाटीजवळ प्रसाद भालेराव या तरुणाचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा संशयितांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

Four murderers remanded in custody | खून करणाऱ्या चौघांना कोठडी

खून करणाऱ्या चौघांना कोठडी

सिडको : येथील स्टेट बँक चौपाटीजवळ प्रसाद भालेराव या तरुणाचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा संशयितांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

सिडकोतील स्टेट बँक चौपाटी येथील सोनाली मटण खाणावळीसमोर बुधवारी (दि.२८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता. देवळाली गाव येथील प्रसाद भालेराव हा त्याच्या काही मित्रांसमवेत जेवण करण्यासाठी आला होता, त्यावेळी वादावादी होऊन डोक्यात फरशीचा तुकडा टाकून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अनिल विटेकर ऊर्फ जुन्या, राहुल पिटेकर, अतुल पिटेकर व संदीप गायकवाड यासह दोघा विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले. शुक्रवारी या सर्वांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने येत्या ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Four murderers remanded in custody