शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 01:42 IST

नाशिक जिल्ह्यातील देवळा-नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर (ता.देवळा) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच, तर एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने रामेश्वरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देवाहनांचा चक्काचूर : हिरे कुटुंबीयांवर काळाचा घाला

नाशिक : जिल्ह्यातील देवळा-नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर (ता.देवळा) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच, तर एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने रामेश्वरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रामेश्वर येथील ढेबूड मळा शिवारातील हिरे कुटुंबातील चौघे जण पिंपळगाव (वा.) येथून दुचाकीने (एमएच ४१ के ५६६१) शेतीच्या कामावरून घराकडे परतत होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास देवळा-नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोरून भावडबारी घाटाच्या दिशेने जात असताना नाशिककडून येणाऱ्या कारने (एमएच ४३ एएल ३००९) दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात हिरे कुटुंबातील गोपीनाथ साळूबा हिरे (वय ४२), मंगलबाई गोपीनाथ हिरे (वय ३५) या पती-पत्नीसह मुलगा गोरख गोपीनाथ हिरे (वय १६) हे जागीच ठार झाले, तर मुलगी जागृती गोपीनाथ हिरे (वय १८) ही गंभीर जखमी झाल्याने तिला देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिची अत्यवस्थ स्थिती पाहून तिला मालेगाव येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. मालेगाव येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. देवळा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येऊन त्यांच्यावर रामेश्वर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याबाबत देवळा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

इन्फो

 

शेतातून परतताना आघात

 

गोपीनाथ हिरे हे पिंपळगाव (वा) येथे वाट्याने शेती करत होते. तेथे त्यांनी कांदा लागवड केलेली होती. हे सर्व कुटुंब शेतात निंदणीचे काम करून सायंकाळी घरी परतत असताना काळाने संपूर्ण कुटुंबावर घाला घातला. एकाच कुटुंबावर आघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू