भरवीरला ट्रॅक्टर शोरुममधून चार लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 15:36 IST2021-06-01T15:34:27+5:302021-06-01T15:36:09+5:30
चांदवड : तालुक्यातील भरवीर येथील ट्रॅक्टर शोरुममधून चोरट्यांनी टॅक्टर, रोख रक्कम व कोरे धनादेश असा एकूण चार लाख दहा हजारांचा ऐवज लांबविला.

भरवीरला ट्रॅक्टर शोरुममधून चार लाखांची चोरी
चांदवड : तालुक्यातील भरवीर येथील ट्रॅक्टर शोरुममधून चोरट्यांनी टॅक्टर, रोख रक्कम व कोरे धनादेश असा एकूण चार लाख दहा हजारांचा ऐवज लांबविला. अमित सुनील देशमुख (रा. मंगरूळ) यांच्या भरवीर शिवारातील शेतातील ट्रॅक्टरच्या शोरुममधून अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून शटर उघडून शोरुममधून चार लाख चार हजार किमतीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, सहा हजार रुपये रोख, चार कोरे चेक असा चार लाख दहा हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत अमित देशमुख यांच्या फिर्यादीवरुन चांदवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सनस करीत आहेत.