केवायसीच्या बहाण्याने चार लाख रुपयांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:32 IST2020-06-26T22:40:57+5:302020-06-27T01:32:30+5:30
केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने इगतपुरीतील एकाला चार लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला असून, याप्रकरणी पोलिसांनी सायबर गुन्हा दाखल केला आहे.

केवायसीच्या बहाण्याने चार लाख रुपयांना गंडा
इगतपुरी : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने इगतपुरीतील एकाला चार लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला असून, याप्रकरणी पोलिसांनी सायबर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे काम चालू असून, येथे नोकरीस असलेले रामा अंजनेय रेड्डी (वय ५४, मूळ राहणार तिरूपती, जि. चितौर, हल्ली राहा. साईलीला बिल्डिंग, खालची पेठ, इगतपुरी) यांना दि. २३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या मोबाइलवर केवायसी अपडेट करण्यासाठी संदेश आला. त्यात आपले केवायसी अपडेट करण्यासाठी दहा रुपये लागतील, असे सांगितले. यासाठी रेड्डी यांनी संदेशातील मोबाइल क्रमांकावर दुसऱ्या दिवशी फोन केला असता संदेश पाठविणाºया व्यक्तीने फोनबाबत माहिती सांगून रेड्डी यांचा बँक पासबुक नंबर व क्रेडिट कार्डचा पिन क्रमांक विचारला. त्यानंतर रेड्डी यांनी क्रेडिट कार्डचा पिन कोड क्र मांक सांगितला. यानंतर संबंधित व्यक्तीने त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून ९६,२३५ रुपये तीन वेळा काढले, तर ९७ हजार २४८ रुपये एक वेळा क्रेडिट कार्डच्या क्रमांकाद्वारे व २५ हजार २२१ रु पये स्टेट बँक खात्यातून अशी एकूण चार लाख ११ हजार १७४ रु पयांची रक्कम काढून घेतली. या गुन्ह्याची नोंद करीत पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी सायबर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.
फसवणूक प्रकरणी रेड्डी यांनी आपल्या खात्यातून रक्कम कमी होत आहे, असे संबंधित व्यक्तीला सांगितले असता त्याने म्हटले की, पुन्हा रक्कम खात्यात जमा होईल. मात्र प्रक्रिया पूर्ण होताच संबंधिताने रेड्डी यांना सांगितले की, तुमची फसवणूक झाली आहे. तुम्हाला काय करायचे ते करा, यावर रेड्डी यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची सर्व माहिती देत लेखी फिर्याद दिली.