विभागात चार लाख मेट्रिक टन खतांचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:40 IST2020-07-17T23:41:24+5:302020-07-18T00:40:23+5:30
नाशिक : विभागात बोगस सोयाबीन बियाणांबाबत एकूण ३५५ तक्रारी दाखल झाल्या असून, बहुतेक तक्रारींची तालुकास्तरावर तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, विभागात रासायनिक खतांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, कोठेही खतांची टंचाई नसल्याचा दावा विभागीय कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.

विभागात चार लाख मेट्रिक टन खतांचा साठा
नाशिक : विभागात बोगस सोयाबीन बियाणांबाबत एकूण ३५५ तक्रारी दाखल झाल्या असून, बहुतेक तक्रारींची तालुकास्तरावर तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, विभागात रासायनिक खतांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, कोठेही खतांची टंचाई नसल्याचा दावा विभागीय कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.
विभागात रासायनिक खतांचा एकूण ४ लाख १३ हजार ३९४ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. सर्वाधिक साठा नाशिक (१३९४१३ ) तर सर्वात कमी साठा नंदुरबार ( ६२६१४ ) जिल्ह्णात आहे. जळगाव जिल्ह्णात १ लाख ३७ हजार ५६८ तर धुळे जिल्ह्णात ७३ हजार ८२८ मेट्रिक टन साठा आहे. नाशिक जिल्ह्णासाठी युरियाचे ८३१६० मेट्रिक टन इतके आवंटन मंजूर झाले असून, त्यापैकी ५२ हजार ३३५ मेट्रिक टन युरिया प्राप्त झाला आहे. मार्च अखेर जिल्ह्णात २३२५ मेट्रिक टन साठा शिल्लक होता. त्यमुळे सध्या जिल्ह्णात ५४ हजार ६५९ मेट्रिक टन साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे
विभागात बोगस बियाणे आणि खत विक्रीप्रकरणी एकूण १० विक्रेत्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक गुन्हे जळगाव जिल्ह्णात आहेत, अशी माहिती विभागीय कार्यालयातून देण्यात आली.
सोयाबीनबाबत तक्रारी
सोयाबीन बियाणांबाबत विभागत एकूण ३५५ शेतकऱ्यांनी तक्ररी दाखल केल्या होत्या. नाशिक जिल्ह्णात १९०, जलगावमध्ये १२८ तर धुळे जिल्ह्णातून ३७ तक्रारी होत्या. या बियाणे उत्पादक कंपन्यांना बियाणे बदलून देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. बहुतेक कंपन्यांनी तशी तयारी दखविली असून, आतापर्यंत १३५ शेतकऱ्यांना बियाणे बदलून मिळाले आहे.