शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वणीजवळ अपघातात ४ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:27 IST

सप्तशृंगगडावर देवीचा नवसपूर्तीचा धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली. दिंडोरी तालुक्यातील वणीजवळ कृष्णगाव शिवारात आयशर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात होऊन चार भाविक ठार, तर २५ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२०) मध्यरात्री घडली.

पंचवटी /वणी : सप्तशृंगगडावर देवीचा नवसपूर्तीचा धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली. दिंडोरी तालुक्यातील वणीजवळ कृष्णगाव शिवारात आयशर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात होऊन चार भाविक ठार, तर २५ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२०) मध्यरात्री घडली.रविवारी पंचवटीतील काही भाविक सप्तशृंगगडावर नवसपूर्तीच्या धार्मिक विधीसाठी गेले होते. तेथून रात्री उशिरा नाशिकला परतत असताना वणीजवळ कृष्णगाव शिवारात या भाविकांच्या आयशर वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याची बाब चालकाच्या लक्षात आली. यावेळी चालकाने आयशर ट्रक रस्त्यात असलेल्या गतिरोधकाजवळ थांबविली; मात्र काही भाविक खाली उतरण्याच्या प्रयत्नात असताना त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मालट्रकने (एमएच १५ एव्ही १९५५) त्यांना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की आयशर वाहन सुमारे २५ फूट पुढे जाऊन रस्त्याच्याकडेला उलटले. या धडकेत चार भाविक जागीच ठार झाले, तर इतर वीस ते पंचवीस भाविक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पुरुष, महिला तसेच लहान मुलांचा समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रकचालकाने वाहन सोडून पळ काढला. पोलिसांनी फरार ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अपघाताची नोंद वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली. याबाबत पुढील तपास सहायक निरीक्षक प्रवीण पाडवी, उपनिरीक्षक नितीन पाटील करीत आहेत.जखमींवर वणी रुग्णालयात उपचारअपघातात ठार झालेल्या चौघांपैकी तिघे युवक हे पंचवटीतील पेठरोड येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. सागर अशोक ठाकूर (२३), कुणाल कैलास ठाकूर (२५), गणेश भगवतीप्रसाद ठाकूर (३०) व त्र्यंबकेश्वर येथील आशिष माणिक ठाकूर (३०) यांचा समावेश आहे. अपघातातील सर्व जखमींनावणी येथील ग्रामीण रु ग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू