किरकोळ वादातून हाणामारी युवकाचा मृत्यू, चौघे जखमी

By Admin | Updated: December 1, 2014 01:24 IST2014-12-01T01:22:23+5:302014-12-01T01:24:27+5:30

किरकोळ वादातून हाणामारी युवकाचा मृत्यू, चौघे जखमी

Four killed, minor injuries caused by minor dispute | किरकोळ वादातून हाणामारी युवकाचा मृत्यू, चौघे जखमी

किरकोळ वादातून हाणामारी युवकाचा मृत्यू, चौघे जखमी


सुरगाणा - येथे किरकोळ वादाचे पर्यावरण हाणामारीत होऊन कात्रीने भोसकल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. तर चौघे जखमी झाले. पोलिस अधिकाऱ्यांच्या घरासमोरच हा प्रकार घडला. यामुळे तणाव निर्माण झाल्याने शहरात शिघ्र कृती दलाचा बंदोबस्त लावण्यात आला.
या प्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेत मयत झालेला अक्षय सोनवणए (२०) त्याचा लहान भाऊ रोहीत व चुलत भाऊ शुभम दोघे रस्त्याने जात असताना यशवंत चौधरी यांनी त्यांना शिवणकामाच्या दुकानात बोलावून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर अक्षय व त्याचे मित्र राजेंद्र थोरात, गणेश वडनेरे, भूषण सूर्यवंशी हे दुकानजवळ याचा जाब विचारण्यासाठी जमा झाले असता यशवंत याने कपडे कापण्याच्या मोठ्या कात्रीने एका एकावर वार करण्यास सुरुवात केली. त्यात अक्षयच्या डाव्या मांडीवर जोरदार वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. तर अन्य चौघे किरकोळ जखमी झाले. अक्षययाला उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. परतु तेथे पुरेशी सुविधा नसल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने मृत घोषीत केले.
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळता पोलीस निरीक्षक सुरेश पारधी यांनी घटनास्थळी धाव घेऊन यशवंत चौधरी यास ताब्यात घेऊन अटक केली. अक्षयच्या मृत्यूची बातमी कळताच नागरिकांनी आपआपली दुकाने बंद ठेवली.
दरम्यान सदर वाद सुरु होता त्याचवेळी पोलिस निरिक्षक पारधी यांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर मोठा न होता पुढील अनर्थ टळला असता असा आरोप अनेकांनी करुन पारधी यांचे निलंबनाची कारवाई करावी आणि आरोपी चौधरी यांस कडक शासन केले जावे या मागणीसाठी नाशिकहून शववाहिकेने आणलेला मृतदेह थेट पोलिस ठाण्यात नेण्यात आला. तसेच कारवाईबाबत वरिष्ठ अधिकारींकडून ठोस आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत अक्षयचा मृतदेह पोलिस ठाण्यासमोरुन हलवणार नाही असा निर्णय नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला होता. यावेळी चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन गुंजाळ यांनी दिल्यानंतर मृतदेह अक्षयच्या निवासस्थानी ठेवण्यात आला. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात अक्षयवर अत्यसंस्कार करण्यात आले.अक्षयच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.
अक्षय हा येथील गॅस एजन्सीत दोन वर्षापासून कामाला होता. त्यामुळे शहरात सर्वांच्या परिचयाचा झाला होता. त्याच्या अकस्मात झालेला निधनामुळे शहरात शोककळा पसरली. (वार्ताहर)

Web Title: Four killed, minor injuries caused by minor dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.