आघारला जाळपोळीसह हाणामारीत चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:56 IST2018-09-10T01:55:53+5:302018-09-10T01:56:17+5:30

मालेगाव : तालुक्यातील आघार बु येथे एका हॉटेलचा फलक फाडण्यावरुन दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर दगडफेक व किरकोळ जाळपोळीच्या घटनाही घडल्या. रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात चार जण जखमी झाले

Four injured in clash with fire | आघारला जाळपोळीसह हाणामारीत चार जखमी

आघारला जाळपोळीसह हाणामारीत चार जखमी

मालेगाव : तालुक्यातील आघार बु येथे एका हॉटेलचा फलक फाडण्यावरुन दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर दगडफेक व किरकोळ जाळपोळीच्या घटनाही घडल्या. रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात चार जण जखमी झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. मागील भांडणाच्या कुरापतीवरुनच सदर प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. सदर प्रकार घडल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी दंगानियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आल्याने जमाव पांगला. या हाणामारीत हंसराज भीमराव दहाणे, संदीप निंबा पगारे, खैमानंद साहेबराव आहेर व ज्ञानेश्वर बाळासाहेब हिरे हे चार जण जखमी झाले असून त्यांना धुळे व मालेगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

Web Title: Four injured in clash with fire