शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल वाचविण्यासाठी ‘फोर-जी’ योजना विचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:56 IST

आर्थिक संकटात सापडलेल्या बीसएनएलकडून (भारत संचार निगम लिमिटेड) आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कर्मचारी कपातीसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) आणि फोर-जी स्पेक्ट्रमला परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे.

ठळक मुद्देपुनरुज्जीवनाचे प्रयत्न : दुर्गमभागातील स्वस्त सेवेची ग्वाही

नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या बीसएनएलकडून (भारत संचार निगम लिमिटेड) आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कर्मचारी कपातीसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) आणि फोर-जी स्पेक्ट्रमला परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून संकट स्थितीवरही मात करून बीएसएसएल दुर्गम भागातील परवडणाऱ्या सेवेसह देशातील आपत्कालीन स्थितीतही सेवा सुरूच ठेणार असल्याची ग्वाही बीएसएनएलचे महाव्यवस्थापक संजय कुमार सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.बीएसएनएलला आर्थिक सहकार्यासाठी कें द्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने लाल दिवा दाखवून सेवा बंद करण्याचा सल्ला दिल्याने बीएसएनएल बंद होण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक संजयकुमार सिन्हा यांनी प्रसिद्धपत्रकाच्या माध्यमातून बीएसएनएल बंद होणार नसल्याचा खुलासा केला आहे. बीएसएनल पुनरुज्जीवनासाठी सक्रिय असून बीएसएनएलच्या पुनरुज्जीवणासाठी कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देण्यासोबतच आणि फोर- जी स्पेक्ट्रमला परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संजयकुमार सिन्हा यांनी प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केलेआहे.त्यासोबच बीएसएनएलकडे उपलब्ध असलेल्या मालमत्तांचे मॉनिटरेशन करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असून, यामाध्यमातू आर्थिक पाठबळ उभे करून नैसर्गिक आपत्तीच्या कठीण काळात आणि अगदी दुर्गम ठिकाणीही परवडणारी सेवा बीएसएनएलकडून सुरूच ठेवली जाणार असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.नाशकात ६५० कर्मचाºयांना व्हीआरएस शक्यनाशिक जिल्ह्यात सुमारे बीएसएनएलचे ९५० कर्मचारी व अधिकारी आहे. मात्र सध्यस्थिती तीनशे ते साडेतीनशे कर्मचाºयांवरही जिल्ह्यातील विविध केंद्रांचे कामकाज सुरळीत चालू शकते, अशी माहिती नाशिक महाव्यवस्थापक नितीन महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे कर्मचाºयांना व्हीआरएस मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रांवरील सुरक्षारक्षक आणि अन्य खर्चांत बीएसएनएलने यापूर्वीच कपात केली असून, यात आता कर्मचारी कपातीची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकBSNLबीएसएनएल