शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शहरात वेगवेगळ्या  घटनांमध्ये चौघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:48 IST

शहरातील पंचवटी, उपनगर व सिडको परिसरातील चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़१३) घडली़ आत्महत्या केलेल्यांमध्ये दोन युवक व दोन इसमांचा समावेश असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

नाशिक : शहरातील पंचवटी, उपनगर व सिडको परिसरातील चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़१३) घडली़ आत्महत्या केलेल्यांमध्ये दोन युवक व दोन इसमांचा समावेश असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़  पंचवटीतील फुलेनगर येथील युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़१३) सकाळच्या सुमारास घडली़ सोमनाथ रामदास कडाळे (२२, रा. तीन पुतळे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजेच्या सुमारास कडाळे याने आनंद कोशिरे यांच्या पेरूच्या बागेत विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याचे आजोबा भगवान जाधव यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़  तिसरी घटना जेलरोड परिसरातील अयोध्यानगरमध्ये घडली़ मंगळवारी (दि.१२) मध्यरात्रीच्या सुमारास बंगल्याच्या गच्चीवर साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन गणेश सुरेंद्रनाथ सोनार (२७, रा. विश्वनाथ बंगला) या युवकाने आत्महत्या केली़ ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़तर आत्महत्येची चौथी घटना सिडकोतील पवननगरमध्ये घडली़ कमलाकर शामकांत जोशी (५०) यांनी राहात्या घरी सिलिंगच्या हुकला नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या  आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़  दुसरी घटना वडनेर दुमाला येथे मंगळवारी (दि़१३) दुपारी घडली़ सुनील प्रतापसिंह ढाका (४३, रा. भानू निवास, पाथर्डीरोड-वडनेर दुमाला) यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली़ सुनीलचे वडील प्रतापसिंह ढाका व कुटुंबीय पुण्याला गेले होते़ दुपारी चार वाजेच्या सुमारास घरी परतल्यानंतर मुलगा सुनील याच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्यांना दिसले़ त्यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय