संशयितांना चार दिवस कोठडी

By Admin | Updated: June 5, 2017 01:08 IST2017-06-05T01:08:23+5:302017-06-05T01:08:32+5:30

मनपा सफाई कामगाराचा लूटमारीच्या इराद्याने खून केल्याप्रकरणी दोघा संशयित आरोपींना न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Four days for suspects detained | संशयितांना चार दिवस कोठडी

संशयितांना चार दिवस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : मखमलाबाद नाका परिसरात राहणाऱ्या मनपा सफाई कामगाराचा लूटमारीच्या इराद्याने खून केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांनाही येत्या बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
गोदापात्रात अरुण अशोक बर्वे (३८) याचा मृतदेह आढळून आला होता. बर्वे याचा खून कोणी व का केला याचा शोध घेत असतानाच पोलिसांनी धागेदोऱ्यानुसार बर्वे याचा खून लूटमारीतून झाल्याचा अंदाज वर्तवित पोलिसांनी त्या दिशेने तपास करून सुरुवातील कृष्णा चांदवडकर या संशयिताला ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता आपला सहकारी संशयित आरोपी वैभव ऊर्फ विकी काळे याच्या मदतीने बर्वे याला रामवाडीपुलाजवळ अडवून त्याच्याच दुचाकीवर बसून त्याला कोशिरे मळा येथील मोकळ्या झाडाझुडपात नेले तेथे त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारून त्याचा मृतदेह पाण्यात फेकून दिला होता.
शनिवारी (दि.३) काळे या सराईत गुन्हेगाराला अटक केली होती त्याची कसून चौकशी केली असता चांदवडकरच्या मदतीने बर्वे याचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी रविवारी या दोघा संशयितांना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने दोघांनाही येत्या बुधवारपावेतो (दि. ७) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Four days for suspects detained