जाहिरात परवाने विभागाच्या वसुलीत चार कोटींनी वाढ
By Suyog.joshi | Updated: April 2, 2024 16:01 IST2024-04-02T16:01:28+5:302024-04-02T16:01:49+5:30
महापालिकेच्या कर व संकलन विभागाला घरपट्टीच्या फेरमूल्यांकनाचा फटका बसला.

जाहिरात परवाने विभागाच्या वसुलीत चार कोटींनी वाढ
नाशिक (सुयोग जोशी) : गतवर्षीच्या तुलनेत जाहिरात परवाने विभागाच्या वसुलीत तब्बल चार कोटी रूपयांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी म्हणजेच २०२२-२३ मध्ये खासगी जागेवरील जाहिरात परवाना फीसाठी १७५१५४२३ रुपयांची वसुली झाली होती, यावर्षी २०२३-२४ मध्ये हीच वसुली ४३४८४०४४ रूपये झाली.
मनपा जागांवरील जाहिरात परवान्यांसाठी गेल्यावर्षी ४८३९१००३ तर यावर्षी १९१८६४७० रूपये वसुली झाली. याशिवाय मनपा, खासगी जागेवरील जाहिरात कराची गेल्यावर्षी ६९१८३८९ रूपये तर यंदा ७९७२७२३ एवढी वसुली झाली. गेल्यावर्षी एकूण २९२७२९१५ तर यावर्षी ७०६४३२३७ रूपये एवढी वसुली झाली. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल ४१३७०३२२ रुपयांची अधिक वसुली झाली.
दरम्यान, महापालिकेच्या कर व संकलन विभागाला घरपट्टीच्या फेरमूल्यांकनाचा फटका बसला. त्यामुळे निर्धारित २१० कोटींच्या उद्दिष्टापैकी २०६ कोटींची वसुली झाली, म्हणजेच चार कोटींची वसुलीत घट झाली. ३८ हजार नवीन मिळकतींकडे तब्बल ६२ कोटींची वसुली होती. त्यापैकी केवळ ३५ टक्केच वसुली झाली, अन्यथा ही वसुली ६० ते ७० टक्के झाली असती. घरपट्टी, पाणीपट्टी आणि विकास शुल्क यावर महापालिकेचे आर्थिक स्रोत अवलंबून आहे. त्यामुळे कर विभागाकडून वसुलीसाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना टार्गेट केले जातात.