शहरात चौघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:17 IST2020-08-04T23:09:35+5:302020-08-05T01:17:48+5:30

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरात अल्पवयीन मुलगा, महिलेसह चौघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Four commit suicide in the city | शहरात चौघांची आत्महत्या

शहरात चौघांची आत्महत्या

ठळक मुद्देयाप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.
वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरात अल्पवयीन मुलगा, महिलेसह चौघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सिडकोतील शिवशक्ती चौक परिसरात गणेश भास्कर शिरसाठ (१७) याने सोमवारी (दि.३) राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत आडगाव शिवार येथील रहिवासी कल्पना बापूराव पाटील (५५) यांनी राहत्या घरात विष प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी पाटील यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच उपनगर येथील गौतमनगर परिसरातील योगेश त्र्यंबक गरु ड (३७) यांनी राहत्या घरात विष सेवन केले. त्यांना बिटको रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बाळासाहेब पंढरीनाथ इंगळे (६५, रा. माडसांगवी) हे जकात नाका कमानीजवळ सोमवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Four commit suicide in the city