मटका अड्ड्यावर धाड; १३ जण ताब्यात

By Admin | Updated: November 26, 2015 22:38 IST2015-11-26T22:35:40+5:302015-11-26T22:38:26+5:30

मटका अड्ड्यावर धाड; १३ जण ताब्यात

Forts; 13 people in custody | मटका अड्ड्यावर धाड; १३ जण ताब्यात

मटका अड्ड्यावर धाड; १३ जण ताब्यात

नाशिकरोड : येथील एका मटका अड्ड्यावर नाशिकरोड पोलिसांनी धाड टाकून १३ जुगाऱ्यांना जुगार खेळण्याच्या साहित्यासह अटक केली आहे.
टिळकपथ भागात खुलेआम मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता नाशिकरोड पोलिसांच्या वतीने या ठिकाणी धाड टाकून २८ हजार ५१५ रुपये रोख, ४० हजार रुपये किमतीचे १४ मोबाइल फोन, ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
याप्रकरणी संशयित श्याम सिरसाठ, धनंजय दोंदे, हुसेन अली मोगल, विजय राखपसरे, अरुण गरुड, बाळू गाडेकर, प्रमोद देशमुख, सचिन मेंद्रे, दिलीप निकम, हरिष आहुजा, अजय पारासरे, संजय बागुल, रवींद्र कदम आदिंनी कल्याण बाजार मटका खेळताना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Forts; 13 people in custody