अज्ञात वाहनाच्या धडकेने माजी सरपंच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:23 PM2018-09-04T13:23:56+5:302018-09-04T13:24:19+5:30

विरगाव : सटाणा - ताहाराबाद रस्त्यावर रविवारी सायंकाळी एका अज्ञात वाहनाच्या धडकेने डोंगरेज (ता.बागलाण) येथील माजी सरपंच मन्साराम देवरे यांचे निधन झाले.

Former sarpanch killed by an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेने माजी सरपंच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेने माजी सरपंच ठार

googlenewsNext

विरगाव : सटाणा - ताहाराबाद रस्त्यावर रविवारी सायंकाळी एका अज्ञात वाहनाच्या धडकेने डोंगरेज (ता.बागलाण) येथील माजी सरपंच मन्साराम देवरे यांचे निधन झाले. सटाणा येथून डोंगरेज या गावाकडे ते सायंकाळी मोटरसायकलने परतत होते. या दरम्यान वनोली गावाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. यात ते रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांना तात्काळ सटाणा येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना मालेगाव येथे घेऊन जात असतांना वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली. सोमवारी दुपारी डोंगरेज येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Former sarpanch killed by an unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक