शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या अस्थींचे नाशिकमध्ये रामकुंडात विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 20:23 IST

नाशिक -  देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाची शोभा यात्रा काढून सकाळी विधीवत अस्थि विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन आणि तसेच राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झालेल्या विर्सजनाच्या वेळी भाजपातील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ठळक मुद्देशहरातून काढली शोभा यात्रा महाजन, जानकर यांनी केले विधी

नाशिक-  देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाची शोभा यात्रा काढून सकाळी विधीवत अस्थि विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन आणि तसेच राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झालेल्या विर्सजनाच्या वेळी भाजपातील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

वाजपेयी यांचे अस्थिकलश बुधवारी (दि.२२) मुंबईत आणल्यानंतर नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी तो भाजपाच्या स्थानिक मुख्यालयात आणला होता. त्यानंतर गुरूवारी दिवसभर सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी रीघ लावली होती. शुक्रवारी सकाळी वसंत स्मृती येथून सजवलेल्या रथावरून अस्थिकलश रामकुंडावर नेण्यात आला. वसंतस्मृती, शालिमार, शिवाजीरोड, संत गाडगे महाराज चौक, मेनरोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजावरून रामकुंड असा रथ आणण्यात आला तेव्हा पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. भजनी मंडळांचाही त्यात सहभाग होता. रामकुंडावर अस्थिकलश आल्यानंतर अस्थींचे मंत्रोच्चारात पूजन करण्यात आले त्यानंतर पालकमंत्री महाजन, जानकर, आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते अस्थींचे विसर्जन करण्यात आले. सतीश शुक्ल व त्यांच्या सहकाऱ्यांनी विधी करून घेतले.

यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी,माणिकराव कोकाटे,उपमहापौर प्रथमेश गीते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, सुनील बागुल, माजी महापौर अशोक मुर्तडक, महंत भक्तीचरणदास, सोमेश्वरानंद, लक्ष्मण सावजी, माजी आमदार निशिगंधा मोगल, दिनकर पाटील,नगरसेवक गणेश गीते, जगदीश पाटील, प्रियंका माने, रु ची कुंभारकर आदींसह भाजपाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी