माजी आमदार आसिफ शेख यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:15 IST2021-03-26T04:15:07+5:302021-03-26T04:15:07+5:30

-------------- उपमुख्यमंत्र्यांना १३ मागण्यांचे पत्र आसिफ शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मालेगाव शहराच्या विकासासंदर्भात विविध १३ ...

Former MLA Asif Sheikh joins NCP | माजी आमदार आसिफ शेख यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

माजी आमदार आसिफ शेख यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

--------------

उपमुख्यमंत्र्यांना १३ मागण्यांचे पत्र

आसिफ शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मालेगाव शहराच्या विकासासंदर्भात विविध १३ मागण्यांच्या मुद्द्यांचे पत्र सादर केले आहे. यात शहर व हद्दवाढ भागातील रस्ते विकासासाठी निधी, विकास निधी द्यावा, कामगार बोर्ड पुन्हा कार्यान्वित करून असंघटित कामगारांसाठी योजना राबवाव्यात, मालेगावी तंत्रशिक्षण महाविद्यालय सुरू करावे, जिल्हानिर्मितीचा प्रश्न मार्गी लावावा आदींसह इतर मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. शेख यांच्यासह माजी नगरसेवक शकील जानीबेग, निसार शेख, रियाज अली, शरीफ खान, हिदायतुल्लाह, नबिद मुस्ताक, मोहम्मद फारूक कुरेशी, हबीब खान, अश्फाक अहमद, शेख फरीद, शेख रफीक, अनिस शहा, मो. रिजवान रमजान यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

---------------

मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला त्यावेळी त्यांचे स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ आदी. (२५ मालेगाव एनसीपी)

Web Title: Former MLA Asif Sheikh joins NCP