शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

माजी आमदार आसिफ शेख यांचा काँग्रेसला रामराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 5:11 PM

मालेगाव : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम ठोकला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील काळात कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती माजी आमदार आसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी आमदार शेख राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या वाटेवर : प्रदेशाध्यक्षांकडे दिला राजीनामा

मालेगाव : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम ठोकला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील काळात कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती माजी आमदार आसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी आमदार शेख राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत.आसिफ शेख यांनी गेली दोन दशके काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कामकाज केले आहे. मात्र, वैयक्तिक कारणामुळे काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील काळात कोणत्या पक्षात जायचे याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार शेख यांची राजकीय कारकीर्द वयाच्या १९ व्या वर्षापासून सुरू झाली. १९९८ मध्ये त्यांनी यूथ काँग्रेसचे सचिवपद भूषविले. सन २००२ ते २०१२ पर्यंत ते काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. याच दरम्यान सन २००५ ते २००७ दरम्यानच्या कालावधीत महापालिकेचे महापौर पदही भूषविले. काँग्रेसचा गटनेता म्हणून महापालिकेत कामकाज पाहिले.

२०१४ मध्ये काँग्रेस पक्षाकडून ते आमदार म्हणून निवडून आले होते. गेल्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांना एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. शेख यांच्या राजीनाम्यामुळे मालेगाव काँग्रेसला खिंडार पडले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण