माजी आमदार आसिफ शेख यांचा काँग्रेसला रामराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 17:12 IST2021-02-08T17:11:49+5:302021-02-08T17:12:17+5:30
मालेगाव : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम ठोकला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील काळात कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती माजी आमदार आसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी आमदार शेख राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत.

माजी आमदार आसिफ शेख यांचा काँग्रेसला रामराम
मालेगाव : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम ठोकला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील काळात कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती माजी आमदार आसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी आमदार शेख राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत.
आसिफ शेख यांनी गेली दोन दशके काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कामकाज केले आहे. मात्र, वैयक्तिक कारणामुळे काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील काळात कोणत्या पक्षात जायचे याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार शेख यांची राजकीय कारकीर्द वयाच्या १९ व्या वर्षापासून सुरू झाली. १९९८ मध्ये त्यांनी यूथ काँग्रेसचे सचिवपद भूषविले. सन २००२ ते २०१२ पर्यंत ते काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. याच दरम्यान सन २००५ ते २००७ दरम्यानच्या कालावधीत महापालिकेचे महापौर पदही भूषविले. काँग्रेसचा गटनेता म्हणून महापालिकेत कामकाज पाहिले.
२०१४ मध्ये काँग्रेस पक्षाकडून ते आमदार म्हणून निवडून आले होते. गेल्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांना एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. शेख यांच्या राजीनाम्यामुळे मालेगाव काँग्रेसला खिंडार पडले आहे.