पूर्व प्रभाग सभापतिपदी नव्या चेहऱ्यांना संधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:57 IST2018-03-28T00:57:04+5:302018-03-28T00:57:04+5:30
महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने सलग दुसºया वर्षीही भाजपचाच सभापती विराजमान होणार आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी नव्या चेहºयांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पूर्व प्रभाग सभापतिपदी नव्या चेहऱ्यांना संधी?
संजय शहाणे ।
इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने सलग दुसºया वर्षीही भाजपचाच सभापती विराजमान होणार आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी नव्या चेहºयांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पूर्व विभागामध्ये प्रभाग क्र मांक १४, १५, १६, २३ आणि ३० या पाच प्रभागांचा समावेश आहे. पूर्व विभागातील एकूण १९ नगरसेवकांपैकी भाजप- १२, राष्ट्रवादी कॉँग्रेस- ४, काँग्रेस- २ व अपक्ष- १ असे पक्षीय बलाबल आहे. या विभागात शिवसेना व मनसेचा एकही सदस्य नाही. भाजप नगरसेवकांमध्ये विद्यमान सभापती शाहीन मिर्झा, सलग पाचव्यांदा निवडून आलेले माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी, सलग दुसºयांदा निवडून आलेले सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी व अर्चना थोरात, चौथ्यांदा निवडून आलेले चंद्रकांत खोडे, दुसºयांदा निवडून आलेले अनिल ताजनपुरे यांच्यासह विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते, सुप्रिया खोडे, अॅड. श्याम बडोदे, सुमन भालेराव, रूपाली निकुळे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून सुफियान जीन, समिना मेमन, शोभा साबळे व सुषमा पगारे हे चार नगरसेवक निवडून आलेले आहेत तर काँग्रेसचे राहुल दिवे व आशा तडवी हे सदस्य आहेत. अपक्ष म्हणून निवडून आलेले सय्यद मुशीर यांनी मनसेचे सहयोगी सदस्यपद स्वीकारले आहे. सभापतिपदासाठी भाजपकडून नव्या चेहºयाला संधी दिली जाण्याची शक्यता असून त्यामध्ये प्रामुख्याने सुमन भालेराव, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी आणि अर्चना थोरात यांच्या नावाची चर्चा असून, त्यांच्या पैकी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शोभेचे पद?
मागील वर्षी झालेल्या निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या भाजपाने सत्तापदांचे वाटपाचे सूत्र ठेवले आहे. सर्वांना पदांची संधी देण्याचे आश्वासन पक्षाच्या पदाधिकाºयांनी दिलेले आहे. मात्र, पहिल्याच वर्षी प्रभाग समित्यांसह विषय समित्यांचे सभापतिपद हे निव्वळ शोभेचे ठरल्याने त्याबाबत उत्सुकता कमीच आहे. बºयाच प्रभाग सभा कोरमअभावी चालल्या नाहीत तर विषयांची वानवाही दिसून आली. अधिकारी वर्गाकडूनही या समित्यांना नेहमीच दुय्यम लेखण्यात आले आहे.