माजी नगरसेवक लोंढेंसह चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:46 IST2018-06-18T00:46:00+5:302018-06-18T00:46:00+5:30

दुचाकीला ठोस दिल्याच्या कारणावरून माजी नगरसेवक तथा रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांनी व साथीदारांनी मारहाण केल्याची फिर्याद अरुण जाधव यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ दरम्यान, विकी लोंढे यानेही जाधव यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

 Former corporator Londheen and four others booked | माजी नगरसेवक लोंढेंसह चौघांवर गुन्हा दाखल

माजी नगरसेवक लोंढेंसह चौघांवर गुन्हा दाखल

नाशिक : दुचाकीला ठोस दिल्याच्या कारणावरून माजी नगरसेवक तथा रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांनी व साथीदारांनी मारहाण केल्याची फिर्याद अरुण जाधव यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ दरम्यान, विकी लोंढे यानेही जाधव यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.सातपूर पोलीस ठाण्यात अरुण जाधव (स्वारबाबानगर, सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार (दि़१५) रात्री ८ वाजेच्या सुमारास ते नवीन टाटा मॅजिक गाडी घेऊन जात असताना राजेंद्र वाघ यांच्या मालकीच्या दुचाकीस धक्का लागला जाधव हे वाघ घरी जात असताना संशयित दीपक लोंढे याने २० हजार रुपये मला देऊन टाक, असे म्हणत कुरापत काढली़ तसेच वाघ यांच्यासह त्यांची पत्नी व भावजयी यांना लाकडी दांडक्याने मारहाण करीत संशयित माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, विकी लोंढे, योगेश लोंढे, बजरंग म्हस्के यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे़
दरम्यान, विकी लोंढे यानेही जाधव व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार संशयित जाधव यांनी दुचाकीस ठोस दिल्यानंतर संशयित कमलेश जाधव, नीलेश जाधव, अरुण जाधव, रमेश जाधव यांची पत्नी व मुलगी, अरुण जाधव यांची पत्नी यांनी मागील भांडणाची कुरापत काढून दमदाटी केल्याचे फिर्यादित म्हटले आहे़

Web Title:  Former corporator Londheen and four others booked