माजी शहर अभियंत्याचीही चौकशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:51 IST2018-05-04T01:51:53+5:302018-05-04T01:51:53+5:30

नाशिक : महापालिकेचे नुकतेच निवृत्त झालेले शहर अभियंता उत्तम पवार यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.

Former city engineer inquiry? | माजी शहर अभियंत्याचीही चौकशी?

माजी शहर अभियंत्याचीही चौकशी?

ठळक मुद्देठपका ठेवून त्यांना चौकशीची नोटीस देण्याच्या हालचाली तक्रारींचे निराकरण वेळेत आणि योग्य पद्धतीने केले नसल्याचा ठपका

नाशिक : महापालिकेचे नुकतेच निवृत्त झालेले शहर अभियंता उत्तम पवार यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या अ‍ॅपवर आलेल्या तक्रारींचे निराकरण वेळेत आणि योग्य पद्धतीने केले नसल्याचा ठपका ठेवून त्यांना चौकशीची नोटीस देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. महापालिकेच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या किंवा निवृत्त झालेल्यांना चौकशीच्या नोटिसा बजावण्याचा सध्या पालिकेत प्रकार सुरू आहे. स्थानिक विरुद्ध शासकीय सेवेतून प्रतिनियुक्तीवर दाखल झालेल्या अधिकाऱ्यांच्या सुप्त संघर्षाची त्याला झालर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उत्तम पवार हे कोणत्याही वादाशिवाय नुकतेच नियत वयोमान पूर्ण करून निवृत्त झाले असले तरी त्यांनादेखील नोटीस बजावण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.

Web Title: Former city engineer inquiry?