शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

टेलिग्रामवरील ‘टास्क’ला भूलला अन् नऊ लाख गमावून बसला; ऑनलाइन फसवणूकीचा शोधला नवा फंडा

By अझहर शेख | Updated: September 2, 2023 17:59 IST

सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक या सोशलमिडियाला आपले ‘टुल्स’ बनविले आहे. 

नाशिक : सुशिक्षित बेरोजगारांना टार्गेट करत आमीष दाखविणे, विविधप्रकारच्या सोशलमिडियावर त्यांना ‘टास्क’ देणे, त्यासाठी मेंबरशिपच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेत सुरूवातीला ‘टास्क’ पुर्ण केले, म्हणून ५००रूपयांपर्यंतची रक्कम बँक खात्यात जमा करून विश्वास संपादन करत लाखोंना गंडा घालण्याचा नवा फंडा सायबर गुन्हेगारांनी शोधून काढला आहे.

आडगाव शिवारात राहणाऱ्या एका दुकानदाराला अशाचप्रकारे पार्टटाइम जॉबचे आमीष व्हॉट्सॲप क्रमांकावरून ‘आलिशा’नावाच्या महिलेने दाखविले. यानंतर ‘फायनान्स बिझनेस’ नावाच्या टेलिग्रामवरील ग्रूपमध्ये जॉइन करून घेतले. यानंतर फिर्यादी दिनेश नगराळे (४८) यांना विविध सूचना देत टास्क सोपविले. त्यावर ‘रिवह्यू’ देण्यास सांगून कमेंट सबमिट केल्यानंतर कमिशन स्वरूपात रक्कम त्या ग्रूपवर आभासी स्वरूपात जमा झाल्याचे दर्शवित गेले. वेळोवेळी असे टास्क पुर्ण केल्यानंतर त्यासाठी रक्कम ऑनलाइन उकळली. तसेच भरलेले पैसे परत मिळविण्याकरिता, व्हीआयपी मेंबरशिपकरिता विविध कारणे ऑनलाइन सांगून त्यांच्या बचत खात्यातून संबंधित कंपनीच्या खात्यात ऑनलाइन युपीआयद्वारे भरणा करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. नगराळे यांना १२ जानेवारी ते ८ एप्रिल २०२३ या कालावधीत तब्बल ९ लाख १० हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातल्याचे समोर आले आहे. सायबर पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

‘टास्क फ्रॉड, जॉब फ्रॉड’मध्ये वाढसायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक या सोशलमिडियाला आपले ‘टुल्स’ बनविले आहे. मात्र आता त्यांनी गुन्ह्याची पद्धत बदलविली असून ऑनलाइन जाळ्यात अडकविण्यासाठी ते कुठल्याहीप्रकारची भीती आता दाखवित नाही, तर लॉटरी लागली, ‘टास्क घ्या अन् घरबसल्या रक्कम कमवा’ असे आमीष दाखवू लागले आहेत. नागरिकांनी अशा भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन नाशिक शहर सायबर पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcyber crimeसायबर क्राइम