जिल्ह्यातील वनांमध्ये वृक्षसंपदेवर कुºहाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 00:28 IST2020-04-20T00:28:17+5:302020-04-20T00:28:34+5:30
जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या वनांमध्ये लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणात तस्कर टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. आठवडाभरात पेठ, हरसूल वनपरिक्षेत्रांमध्ये वनविभागाच्या गस्तीपथकाने छापेमारीचे सत्र सुरू करून सुमारे दीड लाख रुपयांचा अवैधरीत्या दडवून ठेवलेला तोडलेल्या सागाच्या लाकडांचा अडीच घनमीटर इतका साठा जप्त केला आहे.

जिल्ह्यातील वनांमध्ये वृक्षसंपदेवर कुºहाड
नाशिक : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या वनांमध्ये लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणात तस्कर टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. आठवडाभरात पेठ, हरसूल वनपरिक्षेत्रांमध्ये वनविभागाच्या गस्तीपथकाने छापेमारीचे सत्र सुरू करून सुमारे दीड लाख रुपयांचा अवैधरीत्या दडवून ठेवलेला तोडलेल्या सागाच्या लाकडांचा अडीच घनमीटर इतका साठा जप्त केला आहे. सर्वाधिक कारवाया पेठ भागातील नदी-नाल्यांच्या ठिकाणी महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती गावांमध्ये करण्यात आल्या आहेत. एकूणच नाशिकच्या गुजरात सीमेला लागून असलेल्या तालुक्यांतील वनांमध्ये असलेल्या वृक्षसंपदेवर सध्या ह्यकुºहाडह्ण कोसळत आहे.
नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पेठ वनपरिक्षेत्रामध्ये गांडोला गावालगत महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातून सागाचे २३ नग असा एकूण १ घनमीटर लाकूडसाठा वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांच्या रात्रपाळीच्या गस्तीपथकाने जप्त केला. त्याची बाजारभावाप्रमाणे ३५ हजार रुपये इतकी किंमत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याच भागातील आंबा वन परिमंडळमधून रविवारी (दि १९) सकाळी ८ ते दहा सागाचे ३० मी.उंच वाढलेले फुटवे लाकुडतोड्यांनी कापून दडवून ठेवलेले होते, तेदेखील पथकाने जप्त केले. वनपाल डी. डी. पवार, परदेशी, गवळी, वनरक्षक बी. डी. चौधरी, देशमुख, दळवी, शेख यांचा कारवाई पथकात समावेश होता.
हरसूल वनपरिक्षेत्रांतील देवडोंगरी गाव हे अगदी गुजरात सीमेला लागून आहे. या गावाच्या वनांमध्ये खैर, साग यांसारखी मौल्यवान वृक्षसंपदा आढळते. येथील तस्करांनी खैराची दोन मोठी वृक्ष कापून टाकली. या झाडांच्या कापलेल्या सगळ्या फांद्या, बुंधे तस्करांनी तुकडे करून वाहून नेण्यासाठी दडवून ठेवलेले होते. लॉकडाउन काळात वाहन उपलब्ध होत नसल्याने सीमावर्ती भागातील नाशिक जिल्ह्यातील वनांमध्ये तोडलेला माल दडवून ठेवण्यात आला होता याबाबत वनविभागाच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. यानंतर सातत्याने हरसूल, पेठ या दोन्ही वनपरिक्षेत्रांमध्ये मुसळे यांनी छापेमारी सुरू केली आहे. या आठवड्यात एकूण पाच ते सहा ठिकाणी मारलेल्या छाप्यांमध्ये एकूण एक ते दीड लाख रुपये किमतीचा अडीच घनमीटर सागवान लाकूडसाठा पेठ वनपरिक्षेत्रामध्ये जप्त करण्यात आला आहे.
वृक्षतोडीबरोबरच वन्यजिवांची शिकारीची समस्या लॉकडाउन काळात पुन्हा उद््भवली आहे. रानडुकरे, मोर, रानससे यांसारख्या वन्यजिवांची शिकार करण्यासाठीदेखील घूसखोरी या लॉकडाउन काळात वाढली आहे. या परिक्षेत्रात विविध गावोगावी असलेल्या वनांमध्ये गस्तीपथकाने संशयितांचा माग काढला असता अवैधरीत्या फिरस्ती करताना काही लोक दिसून आले मात्र पथकाला बघताच शिकाऱ्यांनी हातातील शस्त्र टाकून पळ काढला. या भागातून कुºहाड, भाले असे साहित्य जप्त केले.