Forest tourism will be promoted at Nandurmadheshwar | नांदूरमधमेश्वर येथे वन पर्यटनाला मिळणार चालना
नांदूरमधमेश्वर येथे वन पर्यटनाला मिळणार चालना

ठळक मुद्देइको टुरिझम बोर्डाकडून निवड : वन्यजीव विभागाच्या व्यवस्थापन आराखड्याला मिळणार मंजुरी

नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य हे निफाडच्या चापडगाव शिवारात आहे. या अभयारण्य क्षेत्राचे सीमांकन अजून निश्चित झालेले नाही, तसेच व्यवस्थापन आराखडाही अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे; मात्र येथे वन पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने जैवविविधतेला पूरक असा ‘वन पर्यटन आराखडा’ राज्याच्या इको टुरिझम बोर्डाकडून तयार केला जात असल्याचे संकेत मिळाले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.
नांदूरमधमेश्वर अभयारण्यात सध्या पर्यटकांसाठी उद्याननिर्मिती, पॅगोडे, प्रसाधनगृहे, इको हट, उपाहारगृह, विश्रामगृह, पक्षी निरीक्षण मनोरे, बाल्कनी, हाइड बाल्कनी, नेचर ट्रेलसारख्या सुविधा सध्या उपलब्ध आहेत. अभयारण्याला लागून असलेल्या चापडगाव, मांजरगाव, करंजगावमधील काही स्थानिक तरुणांची गाइड म्हणून नियुक्तीही केली आहे. या सोयी-सुविधांचा दर्जा अधिकाधिक उंचवावा आणि यापेक्षाही चांगल्या भौतिक सुविधांची भर पडावी, यासाठी मंडळाकडून तसे प्रयत्न केले जात आहे. लवकरच त्याचा अहवाल मंडळाकडून वन्यजीव विभागाला प्राप्त होईल, असे सहायक वनसंरक्षक भरत शिंदे यांनी सांगितले. ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती शासनाच्या वन्यजीव विभागाने गठित केली आहे. सध्या समितीच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार व अभयारण्य क्षेत्रातील विकासकामे येणाऱ्या महसुलातून केली जातात. यावर सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनपाल यांचे नियंत्रण आहे.

वीस नव्या दुर्बिणींची खरेदी
वन्यजीव विभागाने नांदूरमधमेश्वर अभयारण्यात येणाºया पर्यटकांची संख्या लक्षात घेता. यंदा वीस नव्या दुर्बीण खरेदी केल्या आहेत. तसेच पक्षी निरीक्षणासाठी उपयुक्त ठरणारे स्पॉटिंगस्कोपसारखे आधुनिक साहित्यही परदेशातून मागविले आहे. चार स्पॉटिंगस्कोप लवकरच प्राप्त होणार आहेत. सध्या अभयारण्यात टेलिस्कोप उपलब्ध आहेत.
४देशी-विदेशी पक्ष्यांना आकर्षित करणारी ही पाणथळ जागा ‘पक्षितीर्थ’ म्हणून नावलौकिकास आली. निरीक्षणातून या अभयारण्य क्षेत्रात अद्याप २४० पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती, २४ प्रकारचे मासे, ४०० वनस्पतींची विविधता नोंदविली आहे. १९८६ साली हे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित केले गेले.

‘त्या’ ५० स्थळांमध्ये नांदूरमधमेश्वर
येथे येणाºया पर्यटकांना अधिक चांगल्या दर्जेदार सोयी-सुविधा मिळाव्यात आणि वन पर्यटन विकसित व्हावे, यासाठी वनविभागाच्या राज्य इको टुरिझम मंडळाने राज्यातील ५० नैसर्गिक पर्यटनस्थळांची निवड केली आहे. यामध्ये नांदूरमधमेश्वरचाही सहभाग आहे. या पर्यटनस्थळांवर अधिका-धिक चांगल्या भौतिक सोयी-सुविधा, साधने उपलब्ध करून देत पर्यटकांना आकर्षित केले जाणार आहे. नैसर्गिक जैवविविधता आणि वनपर्यटनाची सांगड घातली जाणार आहे.

Web Title: Forest tourism will be promoted at Nandurmadheshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.