तरुणांनी मांडूळ पकडून दिले वन विभागाच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:46 IST2019-02-06T17:46:41+5:302019-02-06T17:46:54+5:30
मालेगाव : येथील संगमेश्वरातील बर्फाच्या कारखान्याजवळ मांडूळ आढळून आले. वन्यप्रेमी तरूणांनी मांडूळ पकडून येथील वनविभागाचे तालुका वन अधिकारी व्ही. डी. कांबळे यांच्या ताब्यात दिले.

तरुणांनी मांडूळ पकडून दिले वन विभागाच्या ताब्यात
मालेगाव : येथील संगमेश्वरातील बर्फाच्या कारखान्याजवळ मांडूळ आढळून आले. वन्यप्रेमी तरूणांनी मांडूळ पकडून येथील वनविभागाचे तालुका वन अधिकारी व्ही. डी. कांबळे यांच्या ताब्यात दिले. बुधवारी सायंकाळी मांडूळाला जंगल अधिवासात सोडणात आले. शहरातील संगमेश्वर भागात बर्फाच्या कारखान्याजवळ मांडूळ आढळून आले. वनमित्र जमील शाह, अमीर शेख, रईस शाह, साजिद शेख, सर्पमित्र नितीन सोनवणे आदिंनी मांडूळ पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. वनविभागाने शहर व तालुक्यात वन्य प्रेमींचा ग्रुप तयार केला आहे. सदर ग्रुप वन्यप्राणी आढळून आल्यास त्याची माहिती वनविभागाला देत असल्याची माहिती वनअधिकारी कांबळे यांनी सांगितले. मांडूळाच्या तस्करीचे प्रकार उघडकीस येत असताना वन्यप्रेमींनी मांडूळ पकडून वनविभागाच्या ताब्यात दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.